मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर काही वेळापूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर गोव्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्याचे भाजपाचे आमदार यांच्यात बैठक सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रमोद सावंत हे गोव्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी शक्यता आहे. प्रमोद सावंतही या बैठकीला हजर आहेत. त्यामुळे आता गोव्यात काय घडणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. विजय सरदेसाई आणि सुदीप ढवळीकर या दोघांकडेही उपमुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे असंही बोललं जातं आहे. आता या बैठकीत  काय घडणार? काय ठरणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp president amit shahunion minister nitin gadkari and bjp goa mlas including pramod sawant arrive at a hotel in panaji for a meeting
First published on: 18-03-2019 at 18:53 IST