News Flash

लडाख स्वायत्त विकास परिषदेच्या सर्व जागा भाजप लढविणार

आगामी लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

आगामी लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
भाजपचे खासदार शमशेर सिंग मन्हास यांनी सांगितले की, लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या सर्व २६ जागा लढविण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मित्र पक्षांशी युती करता येणार असली तरी आम्ही स्वतंत्र लढण्याबाबत विचार करत आहोत. पक्ष नेत्यांनी नुकतीच लडाखला भेट दिली असून पूरग्रस्त भागासाठी एक कोटी दहा लाख रुपयांचा मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मन्हास म्हणाले की, पूरस्थितीमुळे लडाखचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जम्मू प्रांताचा विकास हेच आमचे लक्ष्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 3:04 am

Web Title: bjp to contest all 26 seats of ladakh autonomous hill development council
Next Stories
1 स्वच्छ भारत मोहिमेच्या सचिवांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
2 कलबुर्गी हत्येप्रकरणी रामा सेनेचा प्रमुख प्रसाद अट्टावर ताब्यात
3 काश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार, एक जवान शहीद
Just Now!
X