भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट (http://www.bjp.org/) हॅक झाली आहे. हॅकरने वेबसाईटवर अक्षेपार्ह शब्द लिहले आहेत. याबाबत अद्याप भाजपाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता वेबसाईट हॅक झाली आहे. हॅकरने वेबसाईटवर नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच या व्हिडीओवर अक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत. सध्या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर एक एरर मेसेज दिसत आहे. वेबसाइट हॅक झाल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियावर प्रभारी दिव्य स्पंदना यांनी याबबात ट्विट केले आहे.

वेबसाईट हॅक झाल्यानंतर त्यावर एक अक्षेपार्ह व्हिडीओ दिसत होता. काही वेळानंतर वेबसाईट पूर्णपणे बंद झाली आहे. २० फेब्रुवारी रोजी छत्तीसगढ भाजपाची वेबसाईट हॅक झाली होती. २६ डिसेंबर १९९५ रोजी भाजपाची वेबसाईट सुरू झाली होती. १० ऑक्टोबर २०१८ नंतर वेबसाईटवर काहीही अपडेट केलेले नाही.