उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विषयपत्रिकेवर राम मंदिराच्या मुद्दय़ाला प्राधान्य नसेल. त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे आणलेल्या विकासाच्या मुद्दय़ावर भर दिला जाईल, असे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी जाहीर केले. भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल असे सांगत, निवडणूकपूर्व किंवा नंतर कोणाशीही आघाडी केली जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे अजित सिंह यांच्या लोकदलाशी युतीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यात शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले.
राम मंदिराची उभारणी सहमतीने किंवा न्यायालयीन निर्णयाद्वारे व्हावी अशी भाजपची भूमिका असल्याचे शर्मा यांनी सांगितले.