22 September 2020

News Flash

भाजपाचे सगळे ‘चौकीदार’ चोर आहेत-राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या सगळ्याच नेत्यांवर टीका

राहुल गांधी

भाजपाचे सगळे चौकीदार चोर आहेत अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. या आशयाचा एक ट्विटच राहुल गांधी यांनी पोस्ट केला आहे. भाजपाचे सगळे चौकीदार चोर आहेत असं म्हणत त्यांनी नमो, अरूण जेटली, राजनाथ सिंह अशी नावं लिहिली आहेत. त्यापुढे काही रिकाम्या ओळी लिहून सगळेच चौकीदार चोर आहेत अशी टीका केली आहे.

भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी १८०० कोटी रुपये भाजपाच्या केंद्रीय समितीला वाटले असा आरोप काँग्रेसने केला आहे. याच संदर्भातली एक बातमी ट्विट करत राहुल गांधी यांनीही भाजपाचे सगळे चौकीदार चोर आहेत असे ट्विट केले आहे. द कॅरावानने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारे येडियुरप्पांवर हे आरोप काँग्रेसने केले आहेत. तसेच यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचीही मागणी केली आहे.

राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोटाळा केला आणि अनिल अंबानींना ३० हजार कोटींचे कंत्राट मिळवून दिले असा आरोप राहुल गांधी यांच्यासह सगळ्याच काँग्रेस नेत्यांनी केला आहे. तसंच चौकीदार चोर आहे हे वाक्यही राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात वारंवार वापरत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरबदल केले, त्याची किंमत वाढवली असेही आरोप केले आहेत. तसेच सामान्य माणसाच्या खिशातले पैसे काढून अनिल अंबानींचे खिसे भरले असाही आरोप वारंवार करण्यात आला आहे. मी देशाचा चौकीदार म्हणून काम करणार आहे पंतप्रधान म्हणून नाही अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणांमधून वारंवार केली. ज्याचाच आधार घेत काँग्रेसने चौकीदार चोर है ही मोहीम राबवली.

राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्या या मोहिमेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर मै भी चौकीदार अशी मोहीम सुरु केली. त्यानंतर त्यांना सगळ्याच भाजपा नेत्यांनी फॉलो करत आपल्या नावापुढे मै भी चौकीदार हे लावून ट्विटरवर नावं बदलली. आता याच गोष्टींचा आधार घेत भाजपाचे सगळे चौकीदार चोर असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. या टीकेला आता भाजपाकडून काय उत्तर दिले जाणार? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 6:32 pm

Web Title: bjps all chaukidar are chor tweets rahul gandhi
Next Stories
1 भारतीय पालकांच्या डोक्यात जातीवादाचं शेण: मार्कंडेय काटजू
2 Lok Sabha 2019 : मिठाईच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती; हलवाईची अनोखी शक्कल
3 लोकसभा निवडणूक: महाआघाडीचं जागावाटप जाहीर, आरजेडीला 20 जागा; काँग्रेस नऊ जागांवर समाधानी
Just Now!
X