भारतीय जनता पक्षाच्या २०१४ च्या संसदीय समितीची निवड भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज(रविवार) करण्यात आली. या समितीमध्ये वरूण गांधी, राजीवप्रताप रुडी यांची भाजपच्या महासचिव पदी वर्णी लागली. तर तब्बल सहा वर्षांनंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा भाजप संसदीय समितीत समावेश करण्यात आला आहे. मोदींचा पक्षाचा अंतिम निर्णय घेणा-यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.  भाजप मध्ये पक्षाचे अंतिम निर्णय घेणा-यांमध्ये  वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा समावेश होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पक्ष निवृत्ती नंतर आणि गुजरात मधील मोदींच्या विजयाची हॅट्रीक बघता लालकृष्ण अडवाणींनीही नरेंद्र मोदींच्या या समितीत समावेशावर कोणतीही शंक व्यक्त केली नाही.  तसेच नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जाणारे अमित शहा यांचीही महासचिव पदी निवड करण्यात आली आहे.  उमा भारती, स्मृती इराणी, सदानंद गौडा, सी. पी. ठाकूर, मुख्तार अब्बास नख्वी, सत्पाल मलिक, प्रभात झा, बलबीर पुंज, एस. एस. अहलुविलिया, जुलन ओराम, किरण माहेश्वरी, लक्ष्मी कांता चावला, विजया चक्रवर्ती यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.