बिहारमधील महाबोधी मंदिर परिसरात स्फोट होण्याची शक्यता सुरत्रा यंत्रणांनी वर्तवूनही त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाने(भाजप) उपस्थित केला आहे. बोधीगया परिसरात पहाटे पाचच्या सुमारात हे नऊ साखळी बॉम्बस्फोट झाले. यात पाच जण जखमी झाल्याचे समजते. त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच हा हल्ला दहशतवादी असल्याचे, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पूर्वमाहिती असूनही बॉम्बस्फोट झाले असल्याच्या वृत्तामुळे विरोधकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. “सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱयानंतरही राज्यसरकार सदर ठीकाणी सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरली. केंद्र सरकारने सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरल्याची जबाबदारी स्वीकारायला हवी.” असे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले