देशाचे माजी पंतप्रधान आणि एक मातब्बर नेता म्हणून ओळख असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर संपुर्ण देशातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राजकारणी म्हणू नका किंवा मग कलाविश्वातील एखादा सेलिब्रिटी. प्रत्येकजण अटलजींना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन देत आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानही मागे राहिलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक पंतप्रधान किंवा राजकीय नेता म्हणून वायपेयी यांनी अनेकांवर छाप पाडलीच. पण, एक व्यक्ती म्हणूनही त्यांचा वावर अनेकांच्याच मनात घर करुन गेला. अशा या महान नेत्याला जवळून पाहण्याची, त्यांच्यासोबतच काही क्षण व्यतीत करण्याची संधी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानलाही मिळाली होती. त्याच आठवणी जागवत शाहरुखने त्याच्या बापजींना अर्थात अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे.

सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये शाहरुखने गतकाळातील आठवणींना उजाळा दिला आहे. जेव्हा त्याचे वडील अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणांसाठी न्यायचे. कालांतराने प्रत्यक्ष त्यांची भेट घेण्याचा योग आला. ज्यावेळी शाहरुखने अटलजींसोबत कविता, चित्रपट, राजकारण या विषयांवर बराच वेळ चर्चाही केली होती. घरचे सर्व मंडळी त्यांना बापजी म्हणत, असंही त्याने या पोस्टमध्ये न विसरता लिहिलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे मी माझ्या बालपणाचा एक भाग हरवून बसलो आहे. त्यांच्यासोबतचा वावर आणि त्यांची भेट घेण्याची संधी मिळणं या साऱ्यासाठी मी स्वत:ला फार नशिबवान समजतो, असं लिहित शाहरुखने या कवीमनाच्या त्याच्या बापजींना श्रद्धांजली दिली.

वाचा : अग्रलेख: गीत नहीं गाता हूँ..

बऱ्याच दिवसांपासून अटलजी रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी सायंकाळी या प्रदीर्घ आजारपणाशी झुंज देतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने देशभरातून अनेकांनीच एक आधारस्तंभ गेल्याची भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor shah rukh khan posts heartfelt message on atal bihari vajpayees death
First published on: 17-08-2018 at 09:28 IST