News Flash

मध्य प्रदेश : लग्नाआधीच वधूची ब्यूटी पार्लरमध्ये हत्या, पोलिसांना प्रियकरावर संशय

गुन्ह्यात मदत करणाऱ्या मित्राला पोलिसांनी केली अटक

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात लग्नाआधीच वधूची ब्यूटी पार्लरमध्ये असताना हत्या करण्यात आली आहे. रविवारी जाओरा भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समजतंय. पोलिसांनी या प्रकरणात वधूचा प्रियकर राम यादव याचा हात असल्याचा संशय आहे. वधूचा गळा चिरुन आरोपी राजस्थानला पसार झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपीला हत्येत मदत करण्यासाठी आणि बॉर्डर पार करण्यासाठी मदत करणाऱ्या एका मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

सोनू यादव असं मृत महिलेचं नाव असून ती मध्य प्रदेशातील शहाजपूर जिल्ह्यात राहते. लग्नाच्या दिवशी आपल्या पालकांसोबत ती जाओरामध्ये आली होती. लग्नाआधी मेकअप करण्यासाठी सोनू आपल्या बहिणीसोबत ब्यूटी पार्लरमध्ये पोहचली. यावेळी तिला तिचा प्रियकर राम यादव हा वारंवार फोन करत होता. पण सोनूने रामचे फोन घेणं टाळल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतर रामने मित्राच्या मोबाईलवरुन फोन करत सोनूला ती आता कुठे आहे सांगणं भाग पाडलं. सोनूच्या लग्नाबद्दल माहिती समजताच रामने घटनास्थळी येऊन तिची हत्या करुन पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हत्या केल्यानंतर मित्राच्या बाईकवरुन राम राजस्थानला पळाल्याचा संशय पोलिस अधिकाऱ्यांना आहे. घटनास्थळावरुन राजस्थानची सीमा ही २५ किलोमीटर अंतरावर आहे. पोलिसांनी या प्रकरणी राम यादवच्या मित्राला अटक केली असून रामचा शोध सुरु आहे. अटकेत असलेल्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, ३ वर्षांपूर्वी एका लग्नात राम आणि सोनू यांची भेट झाली आणि नंतर दोघेही प्रेमात पडले. मात्र सोनूच्या लग्नाविषयी समजताच रामने हे कृत्य केल्याचा संशय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 3:44 pm

Web Title: bride murdered in beauty parlour hours before wedding in ratlam cops suspect role of ex lover psd 91
Next Stories
1 देशातील १२ टक्के स्टार्टअपला टाळे; ७० टक्के स्टार्टअपची स्थिती गंभीर
2 चीनने सैन्य मागे घेण्यामागे अजित डोवाल? रविवारी फोनवर चर्चा, सोमवारी माघार
3 ड्रॅगनची नवी चाल, पाकिस्तानला देणार मिसाइल हल्ला करु शकणारे ड्रोन्स
Just Now!
X