ब्रिटनच्या राजसिंहासनाचा दावेदार असलेला युवराज विल्यम हा भारतीय वंशजांशी जनुकीय नाते सांगणारा पहिला ब्रिटिश राजा ठरणार आहे, असे त्याच्या नातेवाईकांच्या डीएनए विश्लेषणातून दिसून आले आहे.डय़ूक ऑफ केंब्रिज असलेल्या तीस वर्षीय विल्यमच्या नातेवाईकांच्या लाळेचे नमुने तपासले असता त्याचा वारसा युवराज्ञी डायनाच्या आईच्या बाजूने थेट एका भारतीय घरगुती कर्मचाऱ्याशी जोडला गेला आहे. थोडक्यात युवराज विल्यमचे जनुकीय नाते भारताशी आहे. तो राजा झाल्यानंतर युरोपेतर डीएनए असलेला पहिला राष्ट्रकुल प्रमुख ठरणार आहे. विल्यमच्या मुलाचा जन्म पुढील महिन्यात होत असून त्यानंतर तो भारताचा पहिला दौरा करील अशी अपेक्षा आहे. संशोधकांनी विल्यमच्या भारतीय पूर्वजांशी असलेल्या नात्याचा छडा लावला आहे. एलिझा केवर्क ही महिला युवराज विल्यमचे खापर पणजोबा असलेले स्कॉटिश व्यापारी थिओडोर फोर्बस हे गुजरातमधील सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीत काम करीत होते. एलिझा यांचा मायटोकाँड्रिया डीएनए हा त्यांच्या मुली व नातींकडून थेट युवराज्ञी डायना यांच्यामध्ये आला व नंतर युवराज विल्यम व युवराज हॅरी यांच्यात आला. एलिझा या आर्मेनियन होत्या असे मानले जाते कारण आर्मेनियन लिपीत त्यांच्या नावाशी साधम्र्य असलेली अक्षरे सापडतात. त्यामुळे तिचे वडील हे आर्मेनियन वंशाचे असावेत. ब्रिटन्स डीएनए या डीएनए वारसा तपासणी कंपनीने असे म्हटले आहे की, त्या महिलेचा आईकडूनचा जनुकीय वारसा बघता ती भारतीय होती.
विल्यम व हॅरी यांच्या एलिझा केवर्क यांचे मार्कर होते पण ते भारतीय मायटोकाँड्रिया डीएनए त्यांच्या मुलांमध्ये आलेले नाहीत कारण मायटोकाँड्रिया डीएनए हा फक्त आईकडून मुलाकडे जात असतो. एडिंबर्ग विद्यापीठाचे जनुकीय तज्ज्ञ जिम विल्सन व ब्रिटन्स डीएनए कंपनी यांनी या चाचण्या केल्या असून त्यांनी सांगितले, की एलिझाच्या वंशजांमध्ये दुर्मीळ स्वरूपाचा मायटोकाँड्रिया डीएनए हा आईकडून आलेला आहे. तो आतापर्यंत इतर १४ जणांमध्ये सापडला आहे. त्यात १३ भारतीय व एक नेपाळी व्यक्ती आहे.
एलिझाच्या मुलांच्या स्कॉटिश वडिलांनी तिला व तिच्या मुली कॅथरिन यांना लगेच ब्रिटनमध्ये का धाडले असावे याचे स्पष्टीकरण यातूनहोत आहे.