‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मालिकेमधील ‘सारूमॅन     द व्हाईट’, ‘ड्रॅक्युला’ भयपटांतील काऊंट ड्रॅक्युला आणि  ‘द मॅन विथ द गोल्डन गन’ या मधील ‘स्कॅरामँगा’ यासारख्या आपल्या भूमिकांतून दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटविणारे मातब्बर ब्रिटिश अभिनेते ख्रिस्तोफर ली यांचा वयाच्या ९३व्या वर्षी मृत्यू झाला.
ली यांनी चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात बाराव्या शतकातील शिल्पकलेवर आधारित ‘कॉरिडॉर ऑफ मिरर’ (१९४७) या प्रणयपटातून केली होती. मात्र त्यांना वयाच्या पन्नाशीपर्यंत प्रसिद्धी मिळाली नव्हती. ‘हॅमर हॉरर’ स्टुडिओच्या चित्रपटांनी ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांची ‘ड्रॅकुला’ची भूमिका खूप गाजली. तसेच त्यांनी ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मध्ये केलेल्या जादूगर सारूमॅनच्या भूमिकेमुळे २००९ मध्ये नाइटहूड व २०११ मध्ये बाफ्ता फेलोशिपने गौरविण्यात आले.