येत्या १५ जूनपासून बीएसएनएलच्या ग्राहकांना रोमिंगचे शुल्क द्यावे लागणार नाही. संपूर्ण देशभरात बीएसएनएलची सेवा ‘रोमिंग फ्री’ करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी दिली. सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या बीएसएनएलने रोमिंग सेवा मोफत केल्यामुळे अन्य कंपन्याही रोमिंगचे शुल्क कमी करण्याची किंवा ही सेवा मोफत देण्याची शक्यता आहे.
देशातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी बीएसएनएलकडून बसविण्यात आलेली वाय-फाय यंत्रणा दोन वर्षांत कार्यान्वित होईल, याकडे आपले मंत्रालय लक्ष देईल, असे त्यांनी सांगितले. येत्या वर्षभरात बीएसएनएलकडून २५०० ठिकाणी वाय-फाय यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.