07 March 2021

News Flash

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार; पहिल्यांदाच दोन टप्प्यात अधिवेशन

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी ते ६ एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात होणार

संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : नव्या वर्षातील (२०१८-१९) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी ते ६ एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात होणार आहे. तर, १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी ही माहिती दिली.

अनंतकुमार म्हणाले, यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. तर दुसरा टप्पा ५ मार्च ते ६ एप्रिल या काळात होईल. दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.

आजवर अर्थसंकल्प सादर करण्याची तारिख २८ फेब्रुवारी असायची. त्यानंतर रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात असे. मात्र, सध्याच्या मोदी सरकारने २०१७ पासून ही अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढून १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याचे निश्चित केले आहे. तसेच स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद करुन मुख्य अर्थसंकल्पातच तो समाविष्ट करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 3:35 pm

Web Title: budget session to be held from 29 january to 6 april budget to be presented on 1 february says parliamentary affairs minister ananth kumar
Next Stories
1 मनुस्मृती किंवा संविधान, मोदी काय निवडणार? जिग्नेश मेवाणींचा सवाल
2 तुरूंगात थंडी वाजते, मग तबला वाजवा- न्यायाधीशांचा लालूंना सल्ला
3 या न्यायाधीशांचा असाही विक्रम, १२ वर्षात एक लाख खटल्यांची सुनावणी
Just Now!
X