अमेरिकेने पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीसीपी) त्यांच्या शेजारी राष्ट्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वाईट आहे. तसंच सरकार कमकुवत करण्यासाठी सायबर मोहिमेद्वारे ते अमेरिका आणि युरोपमध्ये खोटा प्रचार करत आहे. तसंच चीन विकसनशील देशांना चीनवरील अवलंबत्व वाढवून आणि कर्जाच्या ओझ्याखाली ठेवण्याचं काम करत असल्याचं मत अमेरिकेचे पररराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी व्यक्त केलं. तसंच चिनी सैन्यामुळेच भारत चीन सीमेवर तणावर निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

“चिनी सैन्य जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतासोबत तणाव निर्माण करण्यात गुंतलं आहे. दक्षिण चीन समुद्रात चीन आपल्या क्षेत्राचा अवैधरित्या विस्तार करत आहे,” असंही पॉम्पियो म्हणाले. “करोना व्हायरसबद्दलंही चीन खोटं बोलला. तसंच त्यांनी हा व्हायरस जगातील सर्व ठिकाणी पसरू दिला. तसंच आपला हा कट लपवण्यासाठी चीननं जागतिक आरोग्य संघटनेवर दबाव आणला,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. शुक्रवारी त्यांनी ‘कोपेनहेगन डेमोक्रेसी समिट २०२०’ मध्ये ‘युरोप आणि चीनची आव्हानं’ या विषयावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

“चीनच्या कम्युनिस्ट विचारधारेत बदल करून चीनमधील लोकांचं जीवनमान उंचावू शकू असा पश्चिमी देशांना विश्वास होता. परंतु कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीसीपी) आपल्यासोबत उत्तम संबंध असल्याचा बनाव करत फायदा घेत आहे,” असंही पॉम्पियो म्हणाले.

आणखी वाचा- LAC Showdown: जगाकडून भारताचं सांत्वन

जगाचं स्वातंत्र संपवण्याची इच्छा

पॉम्पियो म्हणाले की, “सीसीपीला नाटोसारख्या संस्थांच्या माध्यमातून जगातील निरंतर स्वातंत्र्य आणि वाढ संपुष्टात आणण्याची इच्छा आहे. त्यांना केवळ चीनला फायदा होणारे नियम आणि कायदे अवलंबण्याची इच्छा आहे. सीसीपीने संयुक्त राष्ट्रात केलेला करार मोडून हाँगकाँगचे स्वातंत्र्य संपविण्याचा निर्णय घेतला आहे.”

आणखी वाचा- गलवान खोऱ्यावरुन संघर्ष चिघळणार? चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे महत्वाचे टि्वटस

उइगर मुस्लिमांवर अत्याचार

चीन हाँगकाँग प्रकरणात काय करत आहे, त्याचे फक्त एक उदाहरण आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन केले आहे. चीन मानवी हक्कांचे उल्लंघन करत उइगर मुस्लिमांवर अत्याचार करत असल्याचेही ते म्हणाले.