उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी न्यूयॉर्क येथील भारतीय वाणिज्य दूतावासातर्फे शनिवारी  त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभावर बहिष्कार टाकला.
त्यांच्यासह दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांना बुधवारी बोस्टन विमानतळावर अधिकाऱ्यांनी थांबवून ठेवून विचारपूस केल्यामुळे नाराज झालेल्या अखिलेश यादव यांनी हा निर्णय घेतला.
महावाणिज्यदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वतीने मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासाठी २७ एप्रिल रोजी  स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.