16 September 2019

News Flash

महिलेच्या बाथरुममध्ये पाईपवर सापडला छुपा कॅमेरा, घरमालकाला अटक

घरमालकच मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेतात.

आज हजारो मुलींना नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने दुसऱ्या शहरांमध्ये, राज्यांमध्ये जावे लागते. अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर या मुली भाडयाने घर घेऊन राहतात. खरंतर अशावेळी या मुलींच्या पालकत्वाची जबाबदारी एकप्रकारे त्या घरमालकाची असते. पण अनेकदा हे घरमालकच मुलीच्या परिस्थितीचा फायदा उचलत असल्याचे दिसून आले आहे. अहमदाबादमध्ये भाडयाच्या घरात राहणाऱ्या एका महिलेला असाच धक्कादायक अनुभव आला.

या महिलेच्या बाथरुममध्ये एक कॅमेरा सापडला. चांदखेडा पोलिसांनी या प्रकरणी घरमालकाला अटक केली आहे. पेशाने शिक्षिका असलेल्या एका २५ वर्षीय महिलेने अहमदाबादच्या मोटेरा भागात एक घर भाडयाने घेतले होते. ही महिला मूळची राजकोटची आहे. ती ज्या रुममध्ये राहत होती. त्या रुमच्या बाथरुममधल्या पाईपला बऱ्याच दिवसांपासून गळती लागली होती. ही गळती बंद करण्यासाठी तिने प्लंबरला बोलावले.

त्यावेळी बाथरुमच्या कोपऱ्यात पाईपच्या वर बसवलेली एक वस्तू प्लंबरला दिसली. ती वस्तू कॅमेरा असल्याचे समजल्यानंतर तिला धक्काच बसला. चुंबकाच्या सहाय्याने तो कॅमेरा पाईपवर बसवण्यात आला होता. तिने तात्काळ पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली. या महिलेने रमेश गोसाई (५६) या घरमालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती चांदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक ए.सी.पटेल यांनी दिली.

First Published on March 30, 2018 1:59 pm

Web Title: camera found in girls bathroom
टॅग Camera,Girls,Gujarat