News Flash

स्पर्धा परीक्षेतील उमेदवाराला द्यावी लागणार नाही मुलाखत; ‘या’ राज्याने घेतला निर्णय

स्पर्धा परीक्षांसाठी मुलाखती न घेण्याचे आदेश सरकारतर्फे काढण्यात आले आहेत

गट -१ सेवांसह सर्व विभागांतर्गत असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र)

आंध्र प्रदेश सरकारने गट -१ सेवांसह सर्व विभागांतर्गत असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेमध्ये सरकार पारदर्शकता आणू इच्छित आहे. यासाठीच काळजीपूर्वक तपासणी करून एपीपीएससी परीक्षांची मुलाखत प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. शनिवारी आंध्र प्रदेशचे प्रधान सचिव आदित्यनाथ दास यांनी ही माहिती दिली.

यापूर्वी, राज्य सरकारने २०१९ मध्ये गट -१ वगळता विविध पदांसाठी मुलाखती न घेण्याचा निर्णय घेतला होता, ज्यात पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी आणि उपायुक्त या पदांचा समावेश होता. एपीपीएससीने १८ ऑक्टोबर २०१९ रोजी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत गट -१, गट -२ आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसह सर्व भरती परीक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचा प्रस्ताव दिला होता.

त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. आता, सरकारने आदेश जारी केल्यावनंतर गट -१च्या पदांसह आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षांची मुलाखत पद्धत रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवारांना संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये पूर्ण विश्वास आणि पारदर्शकता वाटावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

दरम्यान, हा नियम शनिवार नंतर देण्यात आलेल्या भरती अधिसूचनेवरच लागू होईल असे सरकारचे प्रधान सचिव यांनी सांगितले. “संपूर्ण निवड प्रक्रियेतील प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पूर्ण आत्मविश्वास मिळवणे हे या निर्णयाचे उद्दीष्ट आहे. या निर्णयानंतर, गट १, गट २ आणि इतरसारख्या लोकप्रिय परीक्षांसाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. हा नवीन नियम शनिवारी आणि त्यानंतर जारी केलेल्या सर्व एपीएससी भरती परीक्षांसाठीच लागू असेल असेल,” असे त्यांनी सांगितले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 3:20 pm

Web Title: candidate in the competitive examination will not have to pay for the interview decision was made by this ap state abn 97
टॅग : Exam,Interview
Next Stories
1 “जननी जन्मभूमिश्च…”, म्हणत राष्ट्रपती झाले नतमस्तक; कॅमेऱ्यात कैद झाले ‘हे’ भावनिक क्षण
2 ….अन् क्षणात त्यानं चालत्या विमानातून उडी टाकली! जाणून घ्या नक्की काय घडलं..
3 7th Pay commission : जुलैपासून कर्मचाऱ्यांचा DA वाढणार?; ‘त्या’ पत्रावर अर्थ मंत्रालयाने केला खुलासा
Just Now!
X