25 February 2021

News Flash

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, असा पाहा तुमचा निकाल

मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

CBSE Results 2020 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. http://cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकता. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावी आणि बारावीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार नाही. सीबीएसई बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार यंदा ८८.७८ टक्के विद्यार्थांनी बारावीची परीक्षा पास केली आहे. त्रिवेंद्रम, बंगळुरू आणि चेन्नईनं यंदा चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली झोनमधील ९४.३९ टक्के विद्यार्थाी पास झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदापण मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात ९२.१५ टक्के मुली पास झाल्या आहेत.

CBSE बोर्डाच्या बारावीचा निकाल अधिकृत खालील संकेतस्थळावर पाहता येईल.

cbseresults.nic.in
cbse.nic.in
results.nic.in

असा पाहा निकाल –

> सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळावर जा…

> होमपेजवर CBSE बोर्ड रिजल्ट 2020 लिंक दिसेल त्यावर क्लीक करा.

> तुमचा बैठक क्रमांक टाकून संबधित माहिती भरा

> सबमिट बटन क्लीक केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 12:54 pm

Web Title: cbse 12th result declared live updat cbseresults nic in nck 90
Next Stories
1 इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही; आमदारांच्या बैठकीत गेहलोत यांचे उद्गार
2 सचिन पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले – काँग्रेस
3 “अमेरिकेपेक्षा भारतात करोनाची परिस्थिती बरी; मला आयुष्यभर इथेच राहू द्या”
Just Now!
X