केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) उद्या २६ मे रोजी बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. देशभरातून एकूण ११.८६ हजार विद्यार्थी बारावीच्या परिक्षेला बसले होते. cbseresults.nic.in, cbse.nic.in and results.nic.in. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मायक्रोसॉफ्टने एक खास अॅप बनवले असून विद्यार्थी त्या माध्यमातून आपले निकाल पाहू शकतात.
मायक्रोसॉफ्टने विद्यार्थ्यांसाठी खास एसएमएस ऑर्गनायझर अॅप बनवले आहे. विद्यार्थी ऑफलाइन असतानाही या अॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकतात. या अॅपचा उपयोग करताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि जन्मतारीख टाकावी लागले.
यावर्षी पाच मार्चपासून सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या होत्या. अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यामुळे सीबीएसईच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. हजारो विद्यार्थ्यांनी त्याविरोधात निदर्शने केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 25, 2018 9:26 pm