News Flash

सावधान! मोबाइलमध्ये विजेचा फोटो काढणं जीवावर, अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू

मुसळधार पाऊस सुरू असताना कडाडणाऱ्या विजांचा फोटो काढताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुसळधार पाऊस सुरू असताना कडाडणाऱ्या विजांचा फोटो काढताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या थिरुवल्लूर जिल्ह्यामध्ये बुधवारी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एच.एम.रमेश या ४३ वर्षीय व्यक्तीचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. ते चेन्नईचे रहिवासी होते. ते सुन्नमपुकुलम येथील त्यांच्या एका मित्राच्या शेतात गेले असताना ही घटना घडली. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विजा चमकत असताना रमेश यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये विजांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. फोटो काढण्याच्या प्रयत्नात असतानाच विज रमेश यांच्यावर पडली आणि ते खाली कोसळले.

मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रमेश यांच्या पश्चात पत्नी आणि एक १३ वर्षांची मुलगी आहे. या घटनेनंतर थिरुवल्लूर जिल्हा पोलिसांनी नागरिकांना विजांचे फोटो न काढण्याच्या सूचना केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 9:52 am

Web Title: chennai man died while trying to take photo of lightning on mobile
Next Stories
1 पुस्तकात सेक्स लाईफबाबत गौप्यस्फोट; वसिम अक्रमने पाठवली रेहम खानला नोटीस
2 नवीन दहशतवाद्यांची भरती मदरशांतून नाही; सरकारी शाळेतून होतेय
3 NRI लग्नाची ४८ तासात नोंदणी झाली पाहिजे, अन्यथा पासपोर्ट, व्हिसा मिळणार नाही – मनेका गांधी
Just Now!
X