छत्तीसगडमधील दंतेवाडा- बिजापूर सीमेवरील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा कंठस्नान घालण्यात आले. मृतांमध्ये तीन महिला नक्षलींचा समावेश आहे.

बिजापूर – दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर तिमिनार आणि पुसनर या गावांमध्ये नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुरुवारी पहाटेपासून सुरक्षा दलांनी जंगलात शोधमोहीम सुरु केली. सकाळी सहाच्या सुमारास नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. घटनास्थळावर सात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून यात तीन महिलांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त केला आहे. यात चार रायफल, एका गनचा समावेश आहे. घटनास्थळी अजूनही चकमक सुरु असल्याचे समजते.