चीनच्या ४३ मोबाइल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने  बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे.  भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचे सांगण्यात आले.

मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे या उपयोजनांवर बंदी घालण्यात येत आहे. २९ जुलै रोजी सरकारने चीनच्या ५९ उपयोजनांवर बंदी घातली होती त्यात टिक टॉक, युसी ब्राउजर यांचा समावेश होता. त्यानंतर २ सप्टेंबरला ११८ उपयोजनांवर बंदी घालण्यात आली त्यात पबजी नॉर्डिक मॅप,लिव्हिक, पबजी मोबाइल लाइट, वुई चॅट वर्क, बायडू, टेनसेंटर वेयुन यांचा समावेश होता. त्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६९ ए अन्वये बंदी घालण्यात आली.

सरकारने म्हटले आहे की, नागरिकांचे हित व देशाचे सार्वभौमत्व लक्षात घेऊन या उपयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे. आज बंदी घालण्यात आलेली उपयोजने पुढीलप्रमाणे, अली सप्लायर्स मोबाइल अ‍ॅप, अलीबाबा वर्कबेंच. अलीएक्स्प्रेस स्मार्टर शॉपिंग, बेटर लिव्हिंग, अलीपे कॅशीयर, लालामुव्ह इंडिया डिलीव्हरी अ‍ॅप, ड्राइव्ह विथ लालामुव्ह इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड- बिझीनेस कार्ड रिडर, कॅमकार्ड बीसीआर (वेस्टर्न), सोल- फॉलो दी सोल टु फाइंड यू, चायनीज सोशल डेटिंग अ‍ॅप, वुईडेट, सिंगॉल डेटिंग अ‍ॅप, अ‍ॅडोर अ‍ॅप, ट्रली चायनीज,  ट्रली आशियन, चायना लव्ह, डेट माय एज, आशियन डेट, फ्लर्टविश, गाइज ओन्ली डेटिंग, टय़ुबिट, वुई वर्क चायना, फर्स्ट लव्ह लाइव्ह, रेला, कॅशियर व्ॉलेट, मँगो टीव्ही, एमजी टीव्ही. वुई टीव्ही,वुई टीव्ही सीड्रामा, व्हीटीव्ही लाइट, लकी लाइव्ह, टाओबाओ लाइव्ह, डिंग टॉक, आयडेंटिटी व्ही, आयसोलँड २, बॉक्स स्टार, हिरोज इव्हाल्व्हड, हॅपी फिश, जेलीपॉप मॅच, म्युककिन वॉच. कॉन्क्विस्टा ऑनलाइन २ यांचा समावेश आहे.

आताच्या निर्णयाने चीनच्या अलीबाबा या कंपनीला फटका बसणार आहे.