चीनची राजधानी बीजिंगमध्ये हवेच्या प्रदूषणाने काळे धुके पसरल्यामुळे सोमवारी स्थानिक सरकारने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. प्रदूषणामुळे पहिल्यांदाच अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी आणि बुधवारी तीव्र स्वरूपाचे काळे धुके पसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार शहरातील काही वाहनांच्या वापरावर आणि वाहतूक कोंडीवर र्निबध लादण्यात आले आहेत. बीजिंगमध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारे काळे धुके पसरले आहे. या पाश्र्वभूमीवर चीनच्या नेतृत्वाने पर्यावरणाचा दर्जा सुधारण्याची प्रतिज्ञा केली आहे.
मोठय़ा प्रमाणात आर्थिक विकास करताना चीनच्या प्रदूषणातही झपाटय़ाने वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. कोळशावरील ऊर्जानिर्मिती केंद्रे, वाहनांचा अर्निबध वापर आणि बांधकाम ही चीनमधील प्रदूषण वाढीची कारणे आहेत.