News Flash

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी १० दिवसात चीन बांधणार हॉस्पिटल

कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

घातक अशा कोरेना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीन येत्या दहा दिवसात नवे रुग्णालय उभे करणार आहे. या आजाराचे मुख्य केंद्र असलेल्या वुहान शहरातच हे रुग्णालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. कोरोना विषाणुंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चीन मध्ये वाढत आहे.

येत्या तीन फेब्रुवारीपासून फक्त कोरोना विषाणुची लागण झालेल्या रुग्णांसाठी या रुग्णालयाचा वापर करण्याचा चीनचा उद्देश आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रसाररोखण्यासाठी चीनमधील काही शहरे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.

चीनमधल्या सरकारी वाहिनीवर रुग्णालय बांधणीसाठी सुरु असलेल्या कामाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. शिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, २५ हजार स्कवेअर मीटरमध्ये हे रुग्णालय उभे राहणार असून त्यामध्ये १ हजार खाटांची व्यवस्था असेल. चीनमध्ये आतापर्यंत ८३० लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. २००३ साली सार्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने बिजींगच्या हद्दीबाहेर आठवडयाभराच्या आत रुग्णालय उभारले होते.

कोरोनामुळे नेमके काय होतं?
कोरोना विषाणूने सर्दीपासून श्वसनाच्या गंभीर आजारापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या विषाणूच्या संसर्गाने ताप, कफ, श्वसनात अडथळे अशी लक्षणे दिसत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४४० जणांना या विषाणूची लागण झाली असून त्यांच्यात न्यूमोनियाची लक्षणे दिसत आहेत. आतापर्यंत मध्य चीनमधील हुबेई प्रांतात नऊ बळी या विषाणूने घेतले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपसंचालक ली बिन यांनी दिली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 2:56 pm

Web Title: china rushes to build new hospital for virus dmp 82
Next Stories
1 मोदी सरकारने हटवली शरद पवारांची सुरक्षा
2 अमेरिकेत येणाऱ्या गर्भवती महिलांना आता व्हिसा नाही; ट्रम्प प्रशासनाचा निर्णय
3 मोटा भाई – छोटा भाईच्या तोंडी हिटलरची भाषा, भुपेश बघेल यांचा मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा
Just Now!
X