विश्वात कुठेतरी परग्रहवासीय असतील तर त्यांच्याशी आता आम्हीच पहिल्यांदा संपर्क साधणार आहोत असा दावा चीनने केला आहे. चीन अवकाश क्षेत्रात महाशक्ती बनण्याचा प्रयत्न करीत असून त्यांनी परग्रहवासीयांशी इतर देशांच्या आधी संपर्क साधण्याची तयारी सुरू केली आहे.

चीनची रेडिओ दुर्बीण ही ५०० मीटर अपरचरची असून ती अमेरिकेतील प्युटरेरिको वेधशाळेत असलेल्या दुर्बिणीच्या दुप्पट आकाराची असून अवकाशातील खोलवर ठिकाणाहून आलेले संदेश ती टिपू शकते. २०१६ मध्ये चीन अवकाश संशोधनात शक्तिशाली बनला असून त्या देशाने टियांगगाँग २ ही अवकाश प्रयोगशाळाच जवळच्या कक्षेत सोडून अमेरिका व चीन यांची बरोबरी केली आहे. अमेरिकेतील महाकाय भिंतीजवळ अनेक यूएफओचे अनुभव आले असून त्याला अनोळखी अवकाशीय वस्तू असे म्हणतात. डेली स्टार ऑनलाइनने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार चीनने अब्जावधी पौंड हे अवकाश संशोधनावर खर्च केले असून त्यात परग्रहवासीयांचे संदेश टिपण्यासाठी रेडिओ दुर्बिणीच्या उभारणीचा समावेश आहे. रेडिओ दुर्बिणींच्या मदतीने अवकाशातील दीíघकांचाही वेध घेता येतो. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी चीनला अवकाश क्षेत्रात महाशक्ती करण्याचे ठरवले असून त्यासाठी काही उपाययोजना आखल्या आहेत. विज्ञान काल्पनिकेतही बसणार नाही इतकी आमची दुर्बीण मोठी व सक्षम आहे असे संशोधक लिऊ सिक्झिन यांनी म्हटले आहे. लिऊ यांच्या मते परग्रहवासीयांना शोधता आले तरी त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात विशेष म्हणजे माणसांना नष्ट केले जाऊ शकते. त्यांनी याबाबत अनेक पुस्तके लिहिली आहेत. एखाद्या दिवशी परग्रहवासीयांचे अवकाश यान आपल्या नजीकच्या कक्षेत येऊ शकते अशी कल्पनाही त्यांनी मांडली आहे. परग्रहवासीयांशी संपर्क साधल्यास ते प्रगत असल्याने आपल्यावर आक्रमण करून मानव जातीला नष्ट करू शकतात असा धोका प्रख्यात विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीही एकदा बोलून दाखवला होता. हा प्रकार नेटिव्ह अमेरिकनांची कोलंबसाशी भेट होण्यासारखा असेल असेही ते म्हणाले होते.