पूर्व लडाख भागात LAC जवळ चीनचं सशस्त्र सैन्य तैनात करण्यात आलं आहे. LAC अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हे सैन्य तैनात करण्यात आलं आहे. चिनी सैन्याच्या हाता स्टिक मॅचेट्स नावाचं शस्त्र आहे. पूर्व लडाख भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हे सैन्य तैनात करण्यात आलं आहे. सुमारे ४० ते ५० सशस्त्र चिनी सैनिक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या हाती धारदार शस्त्र आहेत. एएनआय या वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सोमवारी काय घडलं होतं?

पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा चिनी लष्कराचा आरोप भारतीय लष्कराने फेटाळला. चिनी सैन्यांनी हवेत गोळीबार केला, तसंच भारतीय चौक्यांच्या जवळ आले होते अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. भारतीय लष्कराकडून सोमवारी संध्याकाळी लडाखमध्ये झालेल्या संपूर्ण घटनाक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. पिपल्स लिबरेशन आर्मी सतत कराराचं उल्लंघन करत असून आक्रमकता दाखवत असल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं होतं.

दरम्यान आता चीनने आपलं सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अर्थात LAC जवळ तैनात केलं आहे. ४० ते ५० सैनिक या ठिकाणी तैनात आहेत. त्यांच्या हाती धारदार काठ्या आहेत. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. तसंच एक फोटोही शेअर केला आहे.  जून महिन्यात गलवान खोऱ्यामध्ये चीन आणि भारत या दोन लष्करांमध्ये संघर्ष झाला होता. या संघर्षादरम्यान भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर चीन आणि भारत यांच्यात चांगलाच तणाव निर्माण झाला. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीन विरोधात भारतात संतापाची लाट उसळली. आता चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अर्थात LAC जवळ सैन्य तैनात केलं आहे.