भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची रविवारी पाटण्यातील गांधी मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेच्या ठिकाणी कमी तीव्रतेचे सहा स्फोट झाले. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.
शिवराजसिंह म्हणाले, “पाटण्यात झालेले बॉम्बस्फोट प्रकरण अतिशय गंभीर आहे. याची खोलवर चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मोदी हे देशातील प्रसिद्ध नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कमतरता बाळगता कामा नये” असेही ते म्हणाले.
पाटण्यातील सभेच्या ठिकाणी सुरक्षेत गंभीर त्रुटी – राजनाथ सिंह
तसेच पाटण्यामध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी होत्या असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केला आहे.