20 September 2020

News Flash

संजीव खन्ना मुंबई पोलीसांच्या ताब्यात, पाच दिवसांचा ट्रान्झिट रिमांड

शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी संजीव खन्ना याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा मुंबई पोलीसांचा मार्ग मोकळा झाला आहे.

| August 27, 2015 05:19 am

शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी संजीव खन्ना याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा मुंबई पोलीसांचा मार्ग मोकळा झाला आहे. कोलकात्यातील न्यायालयाने त्याला मुंबई पोलीसांच्या ताब्यात देण्यासाठी पाच दिवसांचा ट्रान्झिट रिमांड गुरुवारी मंजूर केला. संजीव खन्ना याला मुंबईत आणण्यासाठी मुंबई पोलीसांचे पथक कोलकात्यामध्ये दाखल झाले आहे. संजीव खन्ना याच्या चौकशीनंतर शीना बोरा प्रकरणात आणखी माहिती पुढे येऊ शकते. आयएनएक्स इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिने पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना व ड्रायव्हर शाम राय यांच्या साह्य़ाने स्वतःच्याच मुलीची शीना बोराची हत्या केली, अशी कुबली तिने पोलीसांना दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी इंद्राणी मुखर्जी यांना मंगळवारी रात्रीच अटक केली आहे.
हत्या कशी झाली..
२३ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणीने शीनाचे वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाजवळून अपहरण केले. त्यावेळी गाडीत माजी पती संजीव खन्ना व गाडीचालक श्याम राय होते. गाडीतच गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह रायगडजवळील गागोदे गावाजवळील जंगलात फेकून दिला. मृतदेह फेकण्यापूर्वी त्याची ओळख पटू नये यासाठी पेट्रोल ओतून तो जाळून टाकला होता. दरम्यान, गावकऱ्यांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पेण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह हस्तगत केला. तो अर्धवट जळालेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी त्याची ‘अज्ञात’ अशी नोंद करून विल्हेवाट लावली, पण डीएनए नमुने घेऊन ठेवले नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 5:19 am

Web Title: city court grants five day transit remand to mumbai police for taking sanjeev khanna
Next Stories
1 आंदोलनाला हिंसक वळण; सात ठार
2 वजनापेक्षा जास्त बोलण्याची गडकरींना सवयच – नितीशकुमारांचा टोला
3 पाकचे माजी पंतप्रधान गिलानींच्या अटकेचे आदेश
Just Now!
X