बालाकोट एअर स्ट्राइकच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ढगांमुळे पाकिस्तानी रडारला आपली फायटर विमाने सापडणार नाहीत असा विचार मांडला होता. एका मुलाखतीत मोदींनी त्याबद्दल माहिती दिल्यानंतर विरोधकांनी आणि सोशल मीडियामधून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. पण आता इंडियन एअर फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मोदींनी रडारबद्दल केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

ढगांची दाटी असेल तर रडार हवेत उड्डाण करणारी एखादी गोष्ट अचूकतेने पकडू शकत नाही असे पश्चिम एअर कमांडचे एअर मार्शल रघुनाथ नंबियार यांनी म्हटले आहे. एअर स्ट्राइकच्यादिवशी बालकोटमधील वातावरण बिघडल्यामुळे जैशच्या तळावर हल्ला करावा की, करु नये याबद्दल संभ्रमावस्था होती. आपण एअर स्ट्राइकचा दिवस पुढे ढकलावा असे तज्ञांचे मत होते.

त्यावेळी ढगांच्या दाटीमुळे पाकिस्तानी रडारला आपली फायटर विमाने चकवा देऊ शकतात असा विचार पंतप्रधान मोदींनी मांडला होता. या महिन्याच्या सुरुवातीला एका मुलाखतीमध्ये बालाकोट ऑपरेशनबद्दल बोलताना मोदींनी ही माहिती दिल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. मोदींचा दावा खो़डून काढण्यासाठी रडारची क्षमता ढगांपलीकडे पाहण्याची असते. एटीसी रडारच्या माध्यमातून प्रवासी विमानांच्या संपर्कात असते असे त्यावेळी हवाई तज्ञांनी सांगितले होते.

खूप दाट ढग असतील तर रडार अचूकतेने एखादी गोष्ट पकडू शकत नाही असे असे नांबियार म्हणाले. लष्कर प्रमुख बीपीन रावत यांनी सुद्धा रविवारी रडारसंबंधींच्या पंतप्रधान मोदींच्या दाव्याचे समर्थन केले होते. वेगवेगळी टेक्नोलॉजी असलेले अनेक रडार आहेत. काहींची ढगांपलीकडे पाहण्याची क्षमता असते तर काही ढगांपलीकडे पाहू शकत नाहीत असे रावत म्हणाले होते.