केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांवरुन सुरु असणारा वाद थेट अंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचला आहे. मंगळवारी अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने ट्विटरवरुन या आंदोलनासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता भारतीय सेलिब्रिटींनाही ट्विटरच्या माध्यमातून देशातील नागरिकांना एकत्र राहण्याचं आणि एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं आहे. रिहानाच्या ट्विटनंतर अनेक सेलिब्रिटींनी भारत हा प्रोपोगांडाविरोधात म्हणजेच भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर रचण्यात येणाऱ्या कटाविरोधात एकत्र उभा आहे असा मजकूर असलेले ट्विट केले आहेत. यामध्ये भारतरत्न सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, विराट कोहली, अक्षय कुमार, करण जोहर, सुनील शेट्टी, भाजपाचे अनेक नेते आणि इतर मान्यवर मंडळींचाही समावेश आहे. याचबरोबर अनेक सरकार समर्थकांनी ट्विटरवरुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींनी केलेलं भाष्य हे कट कारस्थानाचा भाग असल्याचं म्हटलं आहे. मात्र आता यावरुनच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या खास शैलीमध्ये भाजपा समर्थकांना टोला लगावला आहे.

नक्की पाहा >> Sunny Leone, Johnny Sins, Mia Khalifa एकाच वेळी ट्रेण्डमध्ये; जाणून घ्या नक्की कारण काय?

Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
dewendra fadanvis
आमचा प्रवक्ताही चर्चेत पाणी पाजेल…; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना…
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

बुधवारी सायंकाळी अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन ट्विट केल्यानंतर भाई जगताप यांनी ट्विटवरुनच भाजपा समर्थकांना आणि प्रसारमाध्यमांना टोला लगावला. “आज साक्षात प्रभू रामचंद्र जरी पृथ्वीवर अवतरले व त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली तरी भक्त आणि दलाल माध्यमे त्यांना खलिस्तानी, देशद्रोही आणि काँग्रेसी ठरवतील… इतका स्वतः च्या डोक्यावर परिणाम करून घेतला आहे या भक्तांनी,” असं ट्विट भाई जगताप यांनी केलं आहे.

 

रिहाना काय म्हणाली?

मंगळवारी रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. रिहानाने ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य केलं. शेतकरी आंदोलनावर कोणीही काहीच बोलत नसल्याची खंत रिहानाने व्यक्त केलीय. सीएनएनच्या वृत्ताची लिंक शेअऱ करत तिने या आंदोलनाबद्दल चर्चा का केली जात नाहीय असा प्रश्न उपस्थित केला आहे. दिल्लीच्या सीमेवरील भागात आंदोलन सुरु असणाऱ्या ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आल्याचा उल्लेख असणारं वृत्त रिहानाने शेअर केलं आहे.

नक्की वाचा >> “एका ट्विटमुळे तुमच्या ऐक्याला बाधा पोहचत असेल तर तुम्हाला…”; सेलिब्रिटींना लगावला टोला

नक्की वाचा >> “हा देशाचा अर्थसंकल्प आहे की OLX ची जाहिरात?, यांना शक्य झालं तर…”; खासगीकरणावरुन मोदी सरकारवर निशाणा

 

पडले दोन गट

रिहानाच्या ट्विटवरुन नेटकऱ्यांमध्येच दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी रिहानाने हा मुद्दा मांडल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाची दखल घेतली जाईल असं म्हटलं आहे तर या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांनी रिहानानं हे ट्विट पैसे घेऊन केल्याचा आरोप केला आहे. रिहानाला ज्या गोष्टीबद्दल काहीही माहिती नाही तिने त्याबद्दल बोलू नये असं मतही या आंदोलनाविरोध करणाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.