केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींवरुन मोदी सरकारवर टीका करण्याच्या उत्साहात काँग्रेसने टि्वट करताना एक चूक केली आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकारने आणखी एका जुमल्याने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे असे काँग्रेसने टि्वटमध्ये म्हटले आहे.

या टि्वटमध्ये एक फोटो पोस्ट केला असून त्यात वर्षाला ६ हजार रुपयांचे आश्वासन दिले आणि वास्तवात शेतकऱ्यांना महिन्याला मिळणार फक्त ५०० रुपये असे त्या फोटोत दाखवण्यात आले आहे. खरंतर प्रत्येक महिना ५०० रुपयाप्रमाणे वर्षाचे सहा हजार रुपयेच होतात. हे काँग्रेसने टि्वट करताना ध्यानात घेतलेले नाही.

केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तरतूद केली आहे. दोन हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सरकारकडून ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारने वर्षाला ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.