News Flash

…ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटा, मोदींच्या भाषणावर राहुल गांधींचा अप्रत्यक्ष टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं देशाला संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी. (संग्रहित छायाचित्र)

करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अजुनही वाढत आहे. अनलॉक २ च्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीयांशी संवाद साधला. या भाषणात नरेंद्र मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. यावेळी बोलत असताना मोदींनी अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला असून, सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन होताना दिसत नसल्याची खंत मोदींनी व्यक्त केली.

आणखी वाचा- चीनचा उल्लेखही मोदींनी टाळला

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सैन्यांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष सुरु आहे. त्यातचं केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी App वर बंदीही घातली. आजही गलवान खोरं आणि नजिकच्या भागात चिनी सैन्याच्या कुरापती सुरुच आहेत. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींना चांगलंच लक्ष्य केलं होतं. मोदींच्या भाषणानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक जुना शेर आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत मोदींना टोला लगावला आहे.

आणखी वाचा- बोलायचं होतं चीनवर, पण बोलले…; ओवेसींचा मोदींना शालजोडीतला टोला

राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. चीनने भारताचा बळकावलेला भूभाग आणि २० भारतीय जवांना पत्करावं लागलेलं हौतात्म्य यावरुन राहुल गांधींनी मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 5:39 pm

Web Title: congress mp rahul gandhi criticize pm narendra modi over his speech psd 91
Next Stories
1 चीनचा उल्लेखही मोदींनी टाळला
2 मास्क न घातल्यामुळे १३ हजारांचा दंड : मोदींच्या भाषणात उल्लेख झालेले पंतप्रधान कोणत्या देशाचे??
3 भारत पाक सीमा भागात चिनी एअरफोर्स सक्रिय; राजस्थान सीमेजवळ युद्ध अभ्यासाची तयारी
Just Now!
X