News Flash

२२ हजार कोटींच्या बँकिंग घोटाळ्यावर मोदींनी २ मिनिटे तरी बोलावे: राहुल गांधी

मोदींनी मुलांना परीक्षेबाबत सांगितले पण बँकिंग घोटाळ्यावर मौन बाळगलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणाही साधला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीएनबी घोटाळ्यावरून केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. पीएनबी घोटाळ्याची रक्कम २२ हजार कोटी असल्याचे सांगत राहुल गांधींनी एक ट्विट केले आहे. मुलांना २ तासात परीक्षा उत्तीर्ण होण्याची कल्पना देणाऱ्या पंतप्रधानांनी पीएनबी घोटाळ्यावर २ मिनिटेही भाष्य केलेले नाही. अर्थमंत्री अरूण जेटलीही यावर मौन साधून आहेत. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधान मोदींनी मुलांना २ तासात परीक्षा कशी उत्तीर्ण करायची हे सांगितले. पण २२ हजार कोटींच्या बँकिंग घोटाळ्यावर ते २ मिनिटेही नाही बोलले. जेटली महोदयही लपून बसले आहेत. दोषींसारखी वर्तणूक बंद करा आणि बोला. राहुल गांधी यांनी नीरव मोदीच्या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीही ट्विट करून मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदींच्या मौनाप्रकरणी काँग्रेसने यापूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसने शनिवारी पक्षाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा केली होती. पंतप्रधानांनी मूकदर्शक होण्याऐवजी देशातील सर्वांत मोठ्या बँकेच्या घोटाळ्याप्रश्नी संपूर्ण माहिती देण्याची काँग्रेस मागणी करत असल्याचे म्हटले होते. या घोटाळ्याची सुरुवात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यावेळी झाली जेव्हा पंतप्रधानांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या आणि देशाचा सर्व पैसा बँकिंग प्रणालीमध्ये टाकला होता. यामुळेच नीरव मोदीला बँकांमधून पैसे उपलब्ध झाले, असा दावा राहुल गांधींनी शनिवारी केला होता. ते म्हणाले होते की, जनतेच्या या पैशांच्या घोटाळ्याला कोण जबाबदार आहे. या घोटाळ्याबाबत ज्या लोकांनी बोलू नये असे लोक आज स्पष्टीकरण देत आहेत. तर पंतप्रधानांवर या घोटाळ्याबाबत बोलण्याची जबाबदारी आहे, ते यावर गप्प बसले आहेत. इतक्या मोठ्या घोटाळ्याकडे पंतप्रधान दुर्लक्ष कसे करु शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 3:14 pm

Web Title: congress president rahul gandhi questions pm narendra modi silence over pnb scam says did pariksha pe charcha for 2 hours didnt speak on nirav modi banking fraud for 2 min
Next Stories
1 इराणमध्ये विमान अपघात, ६६ जणांचा मृत्यू
2 राष्‍ट्र भक्तिसाठी भाजपा प्रतिबद्ध, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही
3 Tripura Election : त्रिपुरा विधानसभेसाठी मतदान संपले, ७६ टक्के मतदान
Just Now!
X