झारखंडमध्ये लवकरच स्थापन होणाऱ्या सत्तेत पक्ष सहभागी होणार असल्याचे शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने अधिकृतपणे जाहीर करण्यात
आले.
झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) नेते हेमंत सोरेन यांना राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी पाचारण केल्यास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते राजेंद्र प्रसाद सिंग हे मंत्रीपदाची शपथ घेतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत यांनी जाहीर केले.
राज्यातील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रमिंडळाने केल्यानंतर केंद्र सरकारकडून त्याबाबत अधिकृत सूचना येण्याची प्रतीक्षा आहे. सोरेन यांनी आपल्याला ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचेसांगून ९ जुलै रोजी सरकार स्थापनेचा दावा केला
होता.
आरजेडीनेही यापूर्वीच सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. राजद विविधमंडळ पक्षाच्या नेत्या अन्नपूर्णादेवी या मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे राजदचे प्रदेश प्रवक्ते मनोजकुमार यांनी सांगितले.
घटनेतील तरतुदीनुसार झारखंड मंत्रिमंडळात १२ मंत्री असतील.