25 April 2019

News Flash

पेट्रोलने शंभरी गाठली तरीही हर हर मोदीच!; भक्तांना काँग्रेसचा ट्विटरूपी टोला!

इंधन दरवाढीविरोधात भाष्य करत काँग्रेसने भक्तांनाही डिवचले आहे

पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसने बंद पुकारला होता. या बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून मोदीभक्तांना टार्गेट केले आहे. यामध्ये काँग्रेसने जन की बात असा हॅशटॅग वापरला आहे आणि चार कार्टून ट्विट केली आहेत. २०१५ ते २०१८ या चार वर्षातली ही चार कार्टून आहेत.

२०१५ मधल्या कार्टूनमध्ये मोदीभक्त कारमध्ये बसला आहे तो म्हणतो पेट्रोलने शंभरी गाठली तरीही माझे मत मोदींनाच. २०१६ मध्ये हाच मोदीभक्त नॅनो कारमध्ये बसला आहे. पुन्हा तो तेच म्हणतो आहे पेट्रोलने शंभरी गाठली तरीही माझे मत मोदींनाच. २०१७ च्या कार्टूनमध्ये हाच भक्त स्कूटरवर बसला आहे पुन्हा तो तेच म्हणतो आहे पेट्रोलने शंभरी गाठली तरीही माझे मत मोदींनाच. २०१८ मध्ये हाच भक्त लहान मुलांच्या सायकलवर बसलेला दाखवला आहे आणि तो म्हणतोय काहीही झाले तरीही माझे मत मोदींनाच.

या चारही कार्टूनमधून देशातली इंधन दरवाढ कशी झाली हे काँग्रेसने दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी मोदी भक्तांचीच निवड केली आहे. कारण सायकल चालवली तरीही हे भक्त मोदींनाच मत देतो असे म्हणतील असे काँग्रेसने या व्यंगचित्रातून दाखवून दिले आहे. आता यावर भाजपा काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोदी भक्तांच्या या निष्पापपणाला काय म्हणावे? असा उपरोधिक प्रश्न उपस्थित करणारा एक शेरही काँग्रेसने या कार्टूनसाठी वापरला आहे.

First Published on September 11, 2018 5:39 pm

Web Title: congress tweets cartoon against modi bhakt and fuel rate hike