परकीयांसमोर सरकारची प्रतिमा मलिन करणे याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येऊ शकत नाही. कारण ते आस्थापनांविरुद्धच्या युद्धासमान असते, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वदेशाविरुद्ध गैरवापर होत असेल तर या घटनात्मक अधिकारावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे ‘मेट्रोमॅन’ अशी ओळख असलेल्या आणि लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असलेल्या ई. श्रीधरन यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने काही केले की त्याला विरोध करावयाचा अशी आता प्रथाच पडली आहे. श्रीधरन यांनी  तीन वादग्रस्त कृषी कायद्यांचेही जोरदार समर्थन केले. केरळमध्ये भाजप सत्तेवर  आल्यास आपण मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.