News Flash

खिशाला कात्री; घरगुती सिलिंडर महागला

अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरच्या दरांत वाढ झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सर्वसामान्य नागरिकांचा खिसा आता आणखी खाली होणार आहे, कारण तीन महिन्यानंतर घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. अनुदानित सिलिंडर दोन रुपये आठ पैशांनी महागलं आहे, तर विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात तब्बल ४२ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात येणार आहेत. सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला स्वयंपाकाच्या गॅस आणि विमानाच्या इंधनाच्या दरांचा आढावा घेतात

करात वाढ झाल्यानं हे दर वाढवल्याचं तेल कंपन्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये अनुदानित गॅस सिलेंडर ४९५ रुपये ६१ पैशांना मिळणार आहेत तर विनाअनुदानित सिलेंडर ७०१ रुपये ५० पैशांना मिळेल.

गेल्या दोन महिन्यात सिलिंडरच्या दरांमध्ये २८३ रूपये कपात झाली होती. आज नवे दर लागू करण्यात आले आहेत. नव्या दरांनुसार, मुंबईमध्ये अनुदानित सिलिंडरची किंमत ४९३.३२ रूपये झाली आहे. तर कोलकातामध्ये ४९८.७५ रूपये आणि चेन्नईमध्ये ४८३.४९ रूपये झाला आहे. विनाअनुदानित सिलिंडर मुंबईमध्ये ६७३.५० रूपये किंमतीत मिळणार आहे. तर कोलकातामध्ये ७२७.५० रूपये आणि चेन्नईमध्ये ७१७ रूपांना मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 1:12 pm

Web Title: cooking gas price up by rs 2 08 non subsidised rate hiked by rs 42 50 per cylinder
Next Stories
1 मी RSSचा माणूस, देशाची सेवा हेच माझे कर्तव्य: नितीन गडकरी
2 मसूद अझहर पाकिस्तानात असल्याची परराष्ट्र मंत्र्यांची कबुली
3 ट्रकची पोलीस व्हॅनला धडक, दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू; १७ जखमी
Just Now!
X