News Flash

मुलीने आजारी वडिलांना सायकलवर बसवून पार केलं १२०० किमी अंतर, इवांका ट्रम्पही भारावल्या

इवांका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटला ज्योती कुमारीच्या कामगिरीचा उल्लेख केला आहे

लॉकाउनमुळे एकीकडे स्थलांतरित मजूर पायी तसंच मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान १५ वर्षीय ज्योती कुमारीचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ज्योती कुमारीने आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल १२०० किमी अंतर प्रवास केला आहे. ज्योतीच्या या जिद्दीचं कौतुक केलं जात असून सायकलिंग फेडरेशननेही तिची दखल घेतली असून चाचणीसाठी बोलावलं आहे.

पण सर्वात महत्त्वाची आणि अविश्वसनीय गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनीदेखील ज्योती कुमारीच्या या अशक्यप्राय अशा कामगिरीची दखल घेतली आहे. इवांका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटला ज्योती कुमारीची बातमी शेअर केली आहे. परिस्थितीने हतबल असणाऱ्या ज्योतीने आपल्या जिद्दीच्या जोरावर आज खूप मोठी मजल मारली आहे.

ज्योती कुमारी लॉकडाउन जाहीर होण्याआधी गुरुग्राम येथे वास्तव्यास होती. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाउन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाल्यामुळे त्यांचा रोजगार तुटला. आजारी वडिलांना कोणत्याही परिस्थितीत बिहारला आपल्या गावी न्यायाचं असल्याने अखेर तिने सायकवरुन वडिलांनी नेण्याचा निश्चय केला. इतकंच नाही तर सात दिवसांत तिने १२०० किमीचा टप्पा गाठत वडिलांना सुखरुप घरी पोहोचवलं.

आणखी वाचा- “हे यश नाही तर आमच्या सरकारने केलेली निराशा आहे”, ओमर अब्दुल्लांचं इवांका ट्रम्प यांना उत्तर

ज्योती कुमारीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावलं आहे. “ज्योतीने Trials यशस्वीपणे पूर्ण केली, तर Nation Cycleing Academy च्या कॉम्प्लेक्स मध्ये Trainee म्हणून तिची निवड होऊ शकते.” सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी पीटीआयला माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 11:25 pm

Web Title: coronavirus lockdown donald trump daughter ivanka trump on jyoti kumari who cycled 1200 km carrying father sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दुर्दैवी! नवजात जुळ्या बाळांना करोनाची लागण, डॉक्टरही हळहळले
2 “…अन्यथा भारतातील करोना रुग्णांची संख्या ३६ ते ७० लाखांवर गेली असती”
3 मंदीत ‘ॲमेझॉन’ देणार नोकरीची संधी; भारतात ५०,००० लोकांना मिळणार रोजगार
Just Now!
X