काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (सीआयएससीई) या मंडळाचा दहावीचा (आयसीएसई) आणि बारावीचा (आयएससी) निकाल जाहीर झाला आहे. दहावीच्या परिक्षेत ९९.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर बारावीच्या परीक्षेचा निकाल ९६.८४ टक्के लागला आहे. विद्यार्थी आयोगाच्या http://www.cisce.org या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील. महत्त्वाचं म्हणजे सीआयएससीईने मेरिट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय करोनाचं संकट असल्याने सीआयएससीईने निकाल जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदही घेणार नाही आहे.

एकूण २ लाख ७ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामधील २ लाख ६ हजार ५२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ५४.१९ टक्के असून ४५.८१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षेत ८८ हजार ४०९ विद्यार्थ्यांपैकी ८५हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

डिजीलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणा आहे. तसंच विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठी लगेच अर्ज करता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ४८ तासास विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका उपलब्ध होणार आहे. यासाठी त्यांनी डिजीलॉकर अप डाउनलोड करावं लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठीच बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला. पुढील प्रवेशासाठी ही गुणपत्रिका ग्राह्य धरली जाईल.

निकाल कसा पहायचा –
१) cisce.org किंवा results.cisce.org. या वेबसाइटवर जा
२) होमपेजवर ICSE result 2020 किंवा ISC result 2020 निवडा
३) तिथे तुमचा युआयडी क्रमांक, इंडेक्स क्रमांक तसंच तर विचारण्यात आलेली माहिती भरा
४) Submit किंवा Show Result  वर क्लिक करा
५) यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
६) तुमच्या निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट काढून ठेवा.

SMS च्या माध्यमातूनही माहिती घेऊ शकता –
१) मेसेज बॉक्स उघडा आणि खाली दिलं आहे त्याप्रमाणे टाइप करा
२) ICSE (स्पेस) युनिक आयडी क्रमांक आणि 09248082883 या क्रमांकावर पाठवा
२) ISC >युनिक आयडी क्रमांक आणि 09248082883 या क्रमांकावर पाठवा