25 February 2021

News Flash

धक्कादायक – आठ महिन्यांच्या मुलीवर भावाने केला बलात्कार

मद्याच्या नशेत गुन्हा केल्याचे कबूल

प्रतिकात्मक छायाचित्र

देशाच्या राजधानीमध्ये आठ महिन्याच्या बालिकेवर बलात्कार करण्याचा निर्घृण प्रकार घडला आहे. नवी दिल्लीतल्या नेताजी सुभाष नगरात हा प्रकार घडला असून मद्याच्या ऩशेत हा गुन्हा केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. सदर विकृत गृहस्थ हा या मुलीच्या कुटुंबियांचा नातेवाईक असून तो त्याच घरात राहत होता.

मुलीच्या आईला बाळाच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसले आणि ती घाबरली. तिनं ताबडतोब आपल्या पतीला याची कल्पना दिली. दोघांनी तात्काळ बाळाला घेत हॉस्पिटल गाठलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासल्यावर सगळा प्रकार कळला आणि या बाळावर बलात्कार करण्यात आल्याचं समजलं.

या बाळाचे आई व वडील दोघंही कामानिमित्त बाहेर जातात. बहिणीच्या ताब्यात या कालावधीत ते बाळ असतं जी बाळाला सांभाळते. रविवार असल्यामुळे त्या बहिणीचा 28 वर्षांचा मुलगाही घरीच होता. लांबचा भाऊच असलेल्या या नराधमाने दारूच्या नशेत अवघ्या 8 महिन्यांच्या बाळाशी अमानवी कृत्य केलं असून पोलिसांनी फौजदारी गुन्ह्यासोबत पॉस्कोखाली आरोपीला अटक केली आहे.

सदर मुलीची तब्येत गंभीर जाली होती, मात्र तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता तिची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 11:00 am

Web Title: cousin brother rapes 8 month old baby in new delhi
Next Stories
1 ‘नकोशा’ मुली  २ कोटी १० लाख
2 विकासाच्या आश्वासक वाटेवर शेती, इंधन दरवाढीचे काटे!
3 देशात एकत्र निवडणुका घ्याव्यात!
Just Now!
X