करोना विषाणूचा सर्वाधिक प्रभाव भारतात (Coronavirus In India) झाला आहे. अमेरिकापेक्षाही भारतातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दररोज वाढणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. मागील २४ तासांत अमेरिकेत (Coronavirus In US) ४६ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले तर याच कालावधीत भारतामध्ये ५० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढलले. सलग दुसऱ्या दिवशी भारतात अमेरिकेपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

रविवारी भारतात ५३ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढले होतो. या दिवशी अमेरिकेत ४७ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले होते. रविवारी जगात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण भारतात आढळले होते. रविवारी भारतात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या पाहात काँग्रस नेता राहुल गांधी यांनी पीएम मोदी यांच्यावर टीका केली होती. आजही भारतात अमेरिकापेक्षा जास्त करोनाबाधित रग्ण आढळले आहेत.

आतापर्यंतची काय आहे परिस्थिती –
भारतात आतापर्यंत १८ लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित झाले आहेत. त्यामध्ये ३९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १२ लाखांपेक्षा जास्त जण करोनामुक्त झाले आहेत. तर पाच लाख ८५ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामधील जवळपास ९ हजार रुग्ण अतिगंभिर आहेत.

R-value मध्ये घसरण –
दिलासादायक बाब म्हणजे, नुकतेच एका अभ्यासात असे समोर आले आहे की, कोविड-19 च्या R-value म्हणजेच रि-प्रोडक्टिव व्हॅल्यू (R-value) मध्ये दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai) आणि चेन्नईमध्ये (Chennai) घसरण झाली आहे. म्हणजेच या तीन मेट्रो शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. करोना महामारीचा प्रभाव या शहरात कमी होत आहे. तज्ज्ञांच्या मते नागरिकांनी अशा परिस्थिती काळजी नाही घेतली तर संसर्ग पुन्हा वाढू शकतो. या दरम्यान, ‘स्टॅटिस्टिक्स ऍण्ड एप्लिकेशन्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार मेट्रे शहरातील आर-व्हॅल्यू अशा प्रकारे आहे. दिल्ली ०.६६, मुंबई ०.८१ आणि चेन्नई ०.८६ तर देशाची व्हॅल्यू १.१६ इतकी आहे.

काय असते R-Value ?
करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सरासरी लोकांची संख्या म्हणजे आर-व्हॅल्यू होय. (करोनाचा संसर्ग होण्याची टक्केवारी) देशात सर्वाधित R-Value आंध्र प्रदेशमध्ये (१.४८)आहे.