News Flash

दादरी, कलबुर्गी हत्येनंतर का नाही ट्विट केले? – मोहंमद सलीम

असहिष्णुतेच्या मुद्द्यावर नियम १९३ अंतर्गत चर्चेला सोमवारी लोकसभेत सुरुवात झाली.

राज्यसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापू्र्वीच बसपच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून व्ही. के. सिंह यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

जे प्रत्येक विषयावर ट्विट करतात, त्यांनी दादरी हत्याकांड, कलबुर्गी हत्या या घटनांनंतर लगेचच काही ट्विट का केले नाही, असा सवाल करीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार मोहंमद सलीम यांनी भारत हा फॅसिस्ट विचारांचा देश नसून, लोकशाही देश असल्याचे सोमवारी लोकसभेत सांगितले.
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर नियम १९३ अंतर्गत चर्चेला सोमवारी लोकसभेत सुरुवात झाली. चर्चेची सुरुवात मोहंमद सलीम यांनी केली. ते म्हणाले, आपली संस्कृती प्रत्येकाला सहनशीलता शिकवते. सभ्यता हाच आपल्या देशाचा पाया आहे. कोणतीही विचारी, धर्मनिरपेक्ष व्यक्ती असहिष्णुतेचा विरोधच करेल. देशातील सध्याच्या वातावरणामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती नाराज आहेत. मात्र, त्यांचे ऐकून घ्यायला सरकारकडे वेळ नाही. ‘टाइम स्क्वेअर’वर कोण काय म्हणाले ते ऐकता पण आपल्या देशात कोण काय म्हणतंय ते ऐकावेसे वाटत नाही, असा आरोप त्यांनी केला.
लोकशाही व्यवस्थेमध्ये कोण काय खातंय, याकडे सरकारने लक्ष न देता, देशातील प्रत्येक व्यक्तीला खायला मिळतंय का, प्रत्येकाचे पोट भरतंय का, याकडे सरकराने लक्ष दिले पाहिजे, असाही टोला त्यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2015 3:01 pm

Web Title: cpi member mohammad salim criticized union govt over intolerance
टॅग : Lok Sabha
Next Stories
1 राजनाथ सिंहांवरील ‘तो’ आरोप कामकाजातून वगळला
2 पोलीस सेवेतील मुस्लिमांच्या प्रतिनिधित्वाची माहिती उघड न करण्याचा निर्णय
3 ‘सरदार पटेल पंतप्रधान असते, तर भारताचा पाक झाला असता’
Just Now!
X