News Flash

करोडपती उद्योजकाच्या मुलाने फक्त ३० हजारांसाठी केली ६५ वर्षीय व्यक्तीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल

राकेश याने हत्या करत सोन्याचे दागिने केले लंपास

प्रातिनिधिक फोटो

बंगळुरुमध्ये २२ वर्षांच्या तरुणाने ६५ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राकेश याने बॅटने ज्येष्ठ व्यक्तीला मारहाण केली आणि नंतर मानेवर वार करत हत्या केली. यानंतर त्याने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरत पळ काढला. हे सर्व त्याने फक्त आपल्या अंगावर असणारं ३० हजारांचं कर्ज फेडण्यासाठी केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी राकेशला अटक केली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपी पीडित व्यक्तीला मूर्ती यांना ओळखत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. राकेश श्रीमंत कुटुंबातील असून त्याच्या वडिलांची सात कोटींची संपत्ती आहे.

नेमकं काय झालं?
बंगळुरुमधील २२ वर्षीय तरुण राकेश याने ६५ वर्षीय मूर्ती यांची हत्या केली आहे आणि त्यांच्या अंगावरील दागिने लंपास करत पळ काढला. हे दागिने विकून आपल्या डोक्यावर असणारं ३० हजारांचं कर्ज त्याला फेडायचं होतं. १५ जानेवारी रोजी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश याने मूर्ती यांच्यावर पाठीमागून हल्ला केला आणि बॅटने वार केला. नंतर त्याच्या मानेवर वार केला आणि दागिने घेऊन पळ काढला.

राकेश याने झुडपांमध्ये मूर्ती यांचा मृतदेह टाकून देत घटनास्थळावरुन पळ काढला होता. घरी न परतल्याने मूर्ती यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी राकेशची चौकशी केली. यावेळी त्याने आपण हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 10:26 am

Web Title: crorepatis son kills elderly man to pay off rs 30000 debt in bengaluru sgy 87
Next Stories
1 लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेसाठी तेजप्रताप यांचे ‘आझादी पत्र’ अभियान
2 ‘देवाच्या मनात असेल तर मी…’; राम रहीमची आई व अनुयायांना चिठ्ठी
3 शेतकऱ्यांनी पोलीस बॅरिकेड्स तोडले; दिल्लीच्या सीमेवर तणाव
Just Now!
X