भारतात दररोज सरासरी ३७० आत्महत्या होतात. ही धक्कादायक आकडेवारी दस्तुरखुद्द केंद्र सरकारनेच लोकसभेत प्रसिद्ध केली आहे. मंगळवारी संसदेतील प्रश्नोत्तरांच्या तासात लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री आर.पी.एन सिंग यांनी ही माहिती दिली.
देशभरातील आत्महत्यांची आकडेवारी
* २०१० ते २०१२ या कालावधीत ४,०५,६२९
* २०१० मध्ये १ लाख ३४ हजार ५९९
* २०११ मध्ये १ लाख ३५ हजार ५८५
* २०१२ मध्ये १ लाख ३५ हजार ४४५