News Flash

झाडाची पानं तोडल्याने मारहाण झालेल्या दलित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

उत्तर प्रदेशमधील घटना; कुटुंबीयांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रातिनिधिक

उत्तर प्रदेशमधील फतेहपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आंब्याच्या झाडाची पानं तोडल्याने जमावाकडून मारहाण झालेल्या २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मारहाण झाल्याने हा तरूण अतिशय नाराज झाला होता, यामुळेच त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा या तरूणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. धर्मपाल दिवाकर असं नाव असलेला हा तरूण मालवण पोलिस स्टेशन हद्दीच्या अंतर्गत येणाऱ्या अस्ता या गावात राहत होता. या ठिकाणी स्वतःच्या घरात मंगळवारी त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती स्टेशन ऑफिसर शेरसिंग राजपूत यांनी बुधवारी दिली.

आणखी वाचा- “तुम्ही माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आणि आता अंत्यसंस्कारही करू देत नाहीत”

आत्महत्या केलेल्या तरूणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तो जेव्हा गावात बकऱ्या चरण्यास घेऊन गेला होता, तेव्हा त्यांने अंब्याच्या झाडाची पानं तोडली म्हणून काही जणांनी त्याला बेदम मारहाण केली होती. तर, मारहाण झाल्यानंतर जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं आणि गळफास घेत आत्महत्या केली. अशी माहिती राजपूत यांनी दिली आहे.

याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 3:29 pm

Web Title: dalit man hangs self after being beaten up for plucking leaves from tree msr 87
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2 “तुम्ही माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आणि आता अंत्यसंस्कारही करू देत नाहीत”
3 मैसूरच्या शेतकऱ्याची कमाल ! एक एकराच्या जागेत घेतो ३०० प्रकारची पिकं
Just Now!
X