परदेशातील काळा पैसा व अघोषित मालमत्ता जाहीर करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी दिला असून त्या काळात काळा पैसा जाहीर केला नाही, तर कठोर दंड व खटल्याच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काळा पैसा जाहीर करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला जाईल व ही सवलत फक्त एकदाच दिली जाणार आहे. हा कालावधी कमीत कमी ठेवला जाणार असल्याने त्यात फार मोठे लक्ष्य गाठले जाण्याची शक्यता नाही. हा कालावधी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ जुलैच्या सुरुवातीला अधिसूचित करणार असून त्याचा मसुदा तयार केला जात आहे.
ज्या लोकांवर किंवा आस्थापनांवर प्राप्तिकर खाते किंवा सक्तवसुली संस्थांनी कारवाई केली आहे, त्यांना या कालावधीच्या सवलतीचा फायदा दिला जाणार की नाही हे अजून समजलेले नाही.