27 November 2020

News Flash

सरबजित सिंगवर प्राणघातक हल्ला

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील तुरुंगात असलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याच्यावर शुक्रवारी त्याच्या साथीदाराने हल्ला केला. सरबजितच्या डोक्याला जबर मार बसला असून त्याला येथील जिना रुग्णालयात

| April 27, 2013 05:32 am

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील तुरुंगात असलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याच्यावर शुक्रवारी त्याच्या साथीदाराने हल्ला केला. सरबजितच्या डोक्याला जबर मार बसला असून त्याला येथील जिना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संसदेवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अफजल गुरू याला फाशी दिल्यानंतर लाहोरमधील कोट लाखपत तुरुंगात कैद असलेल्या सरबजितवर हल्ला करण्याचा तुरुंगातील इतर कैद्यांचा कट होता. शुक्रवारी सरबजित एका बराकीतून दुसरीकडे जात असताना त्याच्या डोक्यावर या कैद्याने फटका मारला. त्यात सरबजित जबर जखमी झाला.
दरम्यान, सरबजितवर झालेल्या हल्ला प्रकरणावर भारत-पाक सरकारी सूत्रांच्या पातळीवर मौनच बाळगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 5:32 am

Web Title: deadly attack on sarabjit sing
टॅग Attack,Jail
Next Stories
1 सीबीआयच्या कबुलीमुळे सरकार गोत्यात!
2 अश्विनीकुमारांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; पंतप्रधानांचे वक्तव्य
3 बांगलादेश इमारत दुर्घटना : मृतांची संख्या ३०४
Just Now!
X