दिल्ली येथील एका महिला पर्यटकाची तिच्या मित्रासह निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र तत्पूर्वी तिच्यावर एका टॅक्सीचालकाने आणि त्याच्या तिघा सहकाऱ्यांनी बलात्कार केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दिल्ली येथील एक २७ वर्षीय महिला आपल्या २४ वर्षीय मित्रासह २१ ऑक्टोबर रोजी डेहराडून येथे आली होती. दिवाळी जल्लोषात साजरी करण्यासाठी ती येथे आली होती, मात्र अवघ्या दोनच दिवसांत सदर महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली, अशी माहिती विकासनगर सर्कलचे अधिकारी स्वपन किशोर यांनी दिली.
या प्रकरणी चार आरोपींची चौकशी केली असता टॅक्सीचालक राजू, बबलू, गुड्डू आणि कुंदन या चौघांनी आपल्या गुन्ह्य़ाची कबुली दिली. येथून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या चक्राता धबधब्याहून सदर महिला आणि तिचा मित्र दोघेही २३ ऑक्टोबरच्या रात्री परत येत होते. त्या वेळी आपण दोघांकडील सर्व मुद्देमाल लंपास केला आणि त्या २७ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली, अशी कबुली या चौघांनी दिली.
या दुर्दैवी महिलेच्या मित्राचा मृतदेह उत्तरकाशी जिल्ह्य़ातील पुरोला येथे सापडला. मृतदेहाची ओळख पटली आणि हे हत्याकांड उजेडात आले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2014 रोजी प्रकाशित
पर्यटक महिलेवर बलात्कार करून तिची नृशंस हत्या
दिल्ली येथील एका महिला पर्यटकाची तिच्या मित्रासह निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र तत्पूर्वी तिच्यावर एका टॅक्सीचालकाने आणि त्याच्या तिघा सहकाऱ्यांनी बलात्कार केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
First published on: 12-11-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi based tourist allegedly raped and murdered by taxi driver in dehradun