News Flash

आप आमदाराने कार्यालयात केला महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

दिल्लीत राहणाऱ्या ४० वर्षांच्या महिलेने प्रशांत विहार पोलीस ठाण्यात मोहिंदर गोयल यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

दिल्लीतील रिठाला येथील आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असून पेन्शनच्या कामानिमित्त ती गोयल यांच्या संपर्कात आली होती. गोयल यांनी कार्यालयातच माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.

दिल्लीत राहणाऱ्या ४० वर्षांच्या महिलेने प्रशांत विहार पोलीस ठाण्यात मोहिंदर गोयल यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. महिलेच्या पतीचे २००८ साली निधन झाले असून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पेन्शनच्या कामानिमित्त ती गोयल यांच्या संपर्कात आली. पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, गोयल यांनी मला स्वत:च्या घरी भेटायला बोलावले. त्यांनी घरात माझ्यावर बलात्कार केला. यानंतर त्यांनी महिनाभरानंतर स्वत:च्या कार्यालयातही माझ्यावर बलात्कार केला. मी यासंदर्भात स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली होती. यानंतर गोयल यांनी माझी माफी मागितल्याने मी त्यावेळी पोलिसांकडे तक्रार दिली नाही, असे महिलेचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्यात गोयल यांच्या भावाने मला व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवले. मी पोलिसांकडे तक्रार देऊ नये, यासाठी माझ्यावर दबाव देखील टाकण्यात आला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. अखेर अत्याचार असह्य झाल्याने २५ फेब्रुवारी रोजी महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर गोयल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोयल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत बलात्काराचे आरोप फेटाळले आहे. मी महिलेला ओळखतो. पण बलात्काराचा आरोप खोटा आहे. संबंधित महिला माझी बदनामी करत आहे, असे गोयस यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 8:58 am

Web Title: delhi rithala aap mla mohinder goyal booked on charges of rape
Next Stories
1 काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा
2 देशांतर्गत दहशतवादाचा सामना करण्यास भारत सक्षम, कोणाच्या मदतीची गरज नाही : उपराष्ट्रपती
3 राफेलप्रकरणी पीएमओचा गैरवापर; मोदींवर खटला भरण्याची आली वेळ : राहुल गांधी
Just Now!
X