हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले भारतातील ढोलविरा शहराची जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नोंद करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतिक विभागाने मंगळवारी याबाबतची घोषणा केली. युनेस्कोनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबतची घोषणी केली आहे. ढोलविरा शहराचा भारतीय पुरातत्व विभागाने १९६७-६८ मध्ये शोध लावला होता. जगातील सर्वात प्राचीन शहर म्हणून याची नोंद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ब्रेकिंग, ढोलविरा, भारतातील हडप्पाकालीन एक शहर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलं आहे. अभिनंदन”, असं ट्वीट युनेस्कोनं केलं आहे.

गुजरातमधील सागरी किनाऱ्यावर वसलेलं ढोलविरा हे हडप्पाकालीन शहर आहे. या शहराला हडप्पन संस्कृतीचा वारसा आहे. ढोलविरातील शहरी वस्ती १५०० वर्षांच्या काळात उभी राहिली. तेथील वसाहतींमध्ये मध्य शहर, किल्ले, सखल शहर असे भाग दिसतात. तेथे १४-१८ मीटर जाडीची भिंत असून ती संरक्षणात्मक उपाय म्हणून बांधलेली आहे. ऐतिहासिक काळात इतक्या जाडीच्या भिंती दिसत नाहीत, अगदी घातक शस्त्रांच्या वापर काळातही अशा भिंती नव्हत्या. आतापर्यंतच्या संशोधनानुसार या भागात मोठय़ा त्सुनामी नवीन नाहीत. ढोलविराची रूंद भिंतही त्सुनामीपासून रक्षणासाठी बांधलेली होती. त्या काळातही सागरी आपत्ती व्यवस्थापन केले जात होते, असं अभ्यासातून पुढे आलं आहे.

खूशखबर: पुढच्या महिन्यापासून लहान मुलांचं लसीकरण; केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले…

दुसरीकडे तेलंगण राज्यातील वारंगलजवळील पालमपेट, मुलुगु जिल्ह्यात रुद्रेश्वराच्या मंदिराचे नाव (रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाणारे) युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये कोरले गेले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४४ व्या अधिवेशनात २५ जुलै रोजी हा निर्णय घेण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dholavira harappan city inscribed in worldheritage list rmt
First published on: 27-07-2021 at 18:55 IST